Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साठीनंतर ज्येष्ठांनी वेदनाशामक औषधे टाळावे : डॉ. विशाल गुंजाळ

श्री सप्तश्रृंगी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्यान संपन्न

नाशिक प्रतिनिधी :- वयाच्या साठीनंतर शरीरातील स्नायू आणि अवयवांची झीज होते. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या य

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून चौकशी
मंदा आरोटे यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी ः विजयराव चौधरी
कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठाणे-पालघर जिल्ह्यातील प्रश्‍न प्रामुख्याने सोडवू : चैतन्य दळवी

नाशिक प्रतिनिधी :- वयाच्या साठीनंतर शरीरातील स्नायू आणि अवयवांची झीज होते. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, हातापायांना मुंग्या येणे, संधीवात व तत्सम आजार उद्भवतात. त्यावर जास्त प्रमाणात पेनकिलर घेऊ नये. त्यामुळे आपल्या किडनीवर वाईट परिणाम होतो किंवा लगेच ऑपरेशन हा उपाय नसून ज्येष्ठांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा हलके व्यायाम करावेत असा सल्ला नाशिक पेन क्लिनीकचे मणकेविकार तज्ञ डॉ. विशाल गुंजाळ यांनी दिला.

सातपूर येथील श्री सप्तश्रृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी डॉ. गुंजाळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष किसनराव खताळे, शांताराम जमदाडे, प्रकाश महाजन, लोकज्योतीचे जितेंद्र येवले, प्रकाश घ्यार, शांताराम पाटील, हिराबाई सोनवणे उपस्थित होते.

यावेळी महिलांनी व सदस्यांनी विविध आजार व समस्यांचे निराकरण याविषयी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देत डॉ. गुंजाळ यांनी व्यायामाचे हलके प्रकार सांगितले.मणकेविकार टाळायचे असल्यास आता ऑपरेशनची गरज नाही. प्रगत तंत्रज्ञान व संशोधनामुळे इंजेक्शन व औषधोपचारामुळेही मणकेविकाराचा त्रास टाळता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे कुठलेही दुखणे अंगावर काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी रंगनाथ आंधळे, पंढरीनाथ गायखे, चंद्रकांत निर्वाण, भगवान ठाकूर, संध्या देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश महाजन यांनी केले तर आभार शांताराम जमदाडे यांनी मानले

COMMENTS