Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक तास श्रमदान उपक्रम यशस्वी 

नाशिक –  स्वचछ भारत अभियान अंतर्गत आज नाशिक जिल्हयातील सर्व गावांमध्ये एक तारीख एक तास हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात आला. केंद्र्रीय राज्यमंत्र

श्री खोलेश्‍वर देवस्थानची यात्रोत्सवाची कुस्त्यांच्या हंगाम्याने सांगता
‘गाथा परिवार’आणि ‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
Nawab Malik यांचे अंडरवर्ल्डशी संबंध | Devendra Fadnavis यांची संपूर्ण पत्रकार परिषद (Video)

नाशिक –  स्वचछ भारत अभियान अंतर्गत आज नाशिक जिल्हयातील सर्व गावांमध्ये एक तारीख एक तास हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात आला. केंद्र्रीय राज्यमंत्री भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य आदिंनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन श्रमदान केले.विविध सामाजिक संघटनांनीदेखील श्रमदानात सहभागी होत योगदान दिले. जिल्हयात एकुण १९९३ ठिकाणी श्रमदान मोहिम राबविण्यात आली.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हयात १५ सप्टेंबर २०२३ पासून स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हयातील सर्व गावांमध्ये सकाळी १० वाजता एकाचवेळी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यासाठी केद्र शासनाच्या संकेतस्थळावर नाशिक जिल्हयातील सर्व महसुली गावांचे इव्हेंट तयार करुन कार्यक्रम झाल्यावर त्याचे फोटो व माहिती त्यामध्ये भरण्यात आली. राज्यात विहित वेळेत सर्व प्रथम माहिती भरल्याबददल राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी नाशिक जिल्हयाचे अभिनंदन केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी शनिवारी दुपारी याबाबत गटविकास अधिकारी व सर्व यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत सुचना दिल्या. तसेच या मोहिमेसाठी तालुक्यातील खासदार, आमदार आदिंना आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. सदरचा महाश्रमदान कार्यक्रम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी व शाळा परिसर, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचा परिसर, पर्यटन स्थळ, बसस्थानक, धार्मिकस्थळ, नदी किनारे इ. ठिकाणी आयोजित करण्यात आला. केद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी रामशेज किल्यावर श्रमदान करुन या मोहिमेत सहभाग घेतला. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दाभाडी येथे श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला. त्याचप्रमाणे बागलाण तालुकयात आमदार दिलीप बोरसे, निफाड तालुकयात आमदार दिलीप बनकर यांनही श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला. राज्याच्या पाणी व स्वच्छता अभियानाचे अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी नाशिक तालुकयातील महिरावणी ग्रामपंचातींमध्ये उपस्थित राहून श्रमदान केले. 

माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामंपचायतींचे पदाधिकारी व सदस्य, महिला बचतगट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शासकीय कर्मचारी, युवक मंडळे, विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, धर्मदाय प्रतिष्ठाण इतर मंडळे व संस्था आदिंनी श्रमदान मोहिमेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद स्तरावरुन सर्व खातेप्रमुखांना तालुक्यांचे वाटप करण्यात आले. खातेप्रमुखांनी तालुकयांमध्ये जाऊन या मोहिमेचे संनियंत्रण केले तसेच गावात जाऊन मोहिमेत सहभाग घेतला.

नाशिक जिल्हयात एकाचवेळी एवढया मोठया प्रमाणात आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच उपक्रम असून लोकसहभागातून सदरचा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

COMMENTS