ओझर प्रतिनिधी - अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करून देव-देश-धर्मासाठी कार्य करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने महिला सक्षम
ओझर प्रतिनिधी – अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण अशी वाटचाल करून देव-देश-धर्मासाठी कार्य करणाऱ्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे आणि श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात अशा दोन ठिकांनी ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान मातोश्री म्हाळसामाता व मातोश्री फुलामाता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खास महिला साधकांसाठी जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या मातोश्री जगदमाऊली म्हाळसामाता व उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मातोश्री जगदमाऊली फुलामाता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान लक्षवेधी महिला जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात हजारो महिला आठवडाभर उपवास करत मौनव्रत धारण करून जपानुष्ठान करणार असून याच कार्यक्रमात अखंड नंदादीप, यज्ञ,अभिषेक,हस्त लिखित नामजप,रोज पहाटे ठीक ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर श्री बाबाजीकृत विविध ग्रंथांचा सार असलेली नित्यनियम विधी,आरती,सत्संग,प्रवचन,भागवत वाचन,श्रमदान यांसह अनेकविध महिला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांनी जपानुष्ठाना सारख्या दिव्य परंपरेचा प्रारंभ केला. उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी जपानुष्ठान परंपरेला अखंडित जोपासतांना अधिक गती दिली. पुरुष साधकांबरोबरच अंजनी मातेने अंजनेरी गडावर केलेली तप साधना लक्षात घेऊन महिलांसाठी देखील ही जपानुष्ठान परंपरा खुली केली. मातृशक्तीच्या या सोहळ्याचा भविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. भक्त परिवाराच्या वतीने वर्षभर देव-देश-धर्मासाठी विविध कर्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.आता महिला सक्षमीकरणासाठी भक्त परिवार अधिक प्रयत्नशील असतांना दिसत आहे.
COMMENTS