Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत मराठी महिलेला घर नाकारल्याचे उमटले प्रतिसाद

घर नाकारणार्‍या सचिवाला सोसायटीने पदावरुन काढले

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील मुलुंड भागात मराठी महिलेला घर नाकारण्यात आले होते. तृप्ती देवरुखकर यांच्या सोबत हा प्रकार घडला होता. त्यानंतर मनसेने आ

भीम सैनिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातला घेराव| LokNews24|
सीमावादाचा प्रश्‍न केव्हा सुटणार ?
सासरच्या जाचाला कंटाळून आठ महिन्यांच्या गर्भवतीची आत्महत्याl LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईतील मुलुंड भागात मराठी महिलेला घर नाकारण्यात आले होते. तृप्ती देवरुखकर यांच्या सोबत हा प्रकार घडला होता. त्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेताच, संबंधीत व्यक्तीने माफीही मागितली. या प्रकरणातील जागृत महिला तृप्ती देवरुखकर यांनी शिवतीर्थवर शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात बोलताना तृप्ती देवरुखकर म्हणाल्या की, मराठी माणसाला घर नाकारण्याचा अनुभव आल्यानंतर मला सर्वात आधी स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपर्क केला. ते माझ्याबरोबर आले आणि घर नाकारणार्‍या सचिवाला जाब विचारला. मला त्यांच्याकडून मराठीत माफी हवी होती. माझी दुसरी कोणतीच अपेक्षा नव्हती. तशी त्यांनी मराठीतून माफी मागितली आहे. मराठी माणसाला घर नाकारले म्हणून त्या इमारतीच्या सचिवांनी माझी आणि सर्व मराठी माणसांची मराठीत माफी मागावी, अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी मराठीत माफी मागितली. इतकेच नाही तर सोसायटीच्या सदस्यांनी त्यांना पदावरुन काढून टाकली असल्याची माहिती तृप्ती देवरूखकर यांनी दिली आहे. तृप्ती देवरूखकर यांनी सर्वात आधी मनसेचे पदाधिकारी यांनी संपर्क साधला असल्याची माहिती दिली. त्या नंतर शर्मिला ठाकरे यांनी मला भेटण्याची वेळ दिली. कारण मला त्यांचे आभार मानायचे होते. मनसैनिक सर्वात आधी आमच्या मदतीला आले. त्यानंतर सर्व पक्ष आले. आम्ही पोलिस ठाण्यातही तक्रार दाखल केली असल्याचे त्या म्हणाल्या. नंतर सर्वच पक्षाचे लोक आले. मात्र, सुरुवातीला मनसैनिकांनी मदत केली असल्याची माहिती त्यांनी दिली. शर्मिला ठाकरेंनी केले धाडसाचे कौतुक शर्मिला ठाकरे यांच्या भेटीवर त्या म्हणाल्या की, मी धाडसाने पुढे आले म्हणून शर्मिला ठाकरे यांनी माझं कौतुक केले आहे. कारण अनेक मराठी लोकांबरोबर हे प्रकार घडतात, मात्र कुणी बोलत नाही. मी हे प्रकरण समोर आणले. माझ्या मनातील राग व्यक्त केला. याचे शर्मिला ठाकरे यांनी कौतुक केले असल्याची माहिती देखील तृप्ती देवरुखकर यांनी दिली.

COMMENTS