Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर जमावाचा हल्ला

  मणिपूर प्रतिनिधी - मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली पर

शेजारील महिलेच्‍या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या.
पुण्यात बर्निंग बसचा थरार..!
वानटाकळी, वाघाळा येथे कापूस पिकाची शेतीशाळा संपन्न

  मणिपूर प्रतिनिधी – मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. थाबौल जिल्ह्यातील भाजप कार्यालय पेटवल्याची घटना ताजी असतानाच संतप्त जमावाने थेट मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनीही या हिंसक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. 

गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री सिंह यांच्या कुटुंबाच्या रिकाम्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांनी सांगितले की यावेळी सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले. तर मुख्यमंत्री सिंह यांच्या इंफाळ पूर्वेतील हेनगांग येथील वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. घरापासून 100 मीटर अंतरावरच पोलिसांनी जमावाला रोखलं, जवळपास 500 ते 600 लोकांचा जमाव याठिकाणी आला होता. येथे आरएएफचे कर्मचारी तैनात होते. जमावाला पांगवण्यासाठी आरएएफ आणि राज्य पोलीस कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. येथील वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता. घराजवळील बॅरिकेड्स वाढवण्यात आल्या आहेत

COMMENTS