Homeताज्या बातम्यादेश

चालत्या बाईकवर तरुणाला विषारी साप चावला

इंदोर प्रतिनिधी - धावत्या दुचाकीवर साप चावल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण सापाला हातात पकडून दुचाकीवरुन जात होता. सापानं दंश

*आरक्षण यासंदर्भात काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; केली ‘ही’ मागणी | LokNews24
आत्महत्याग्रस्त शेतकरी जोगदंड कुटुंबाचे दोन चिमुकल्यासह आमरण उपोषण
बेन्टेक्सच्या दागिन्यांवर दिले कोट्यवधीचे कर्ज ; नगर अर्बन शेवगाव शाखेतील 5 सोन्याच्या पिशव्या निघाल्या बनावट

इंदोर प्रतिनिधी – धावत्या दुचाकीवर साप चावल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण सापाला हातात पकडून दुचाकीवरुन जात होता. सापानं दंश केल्यानं तरुण कोसळला. घटना मध्य प्रदेशच्या इंदोर जिल्ह्यातील महूमधील तेलीखेडा गावात घडली. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. मनिष (३६) असं मृत तरुणाचं नाव आहे. गोशाला घाटाजवळून साप पकडल्यानंतर मनिष त्याला घेऊन निघाला. त्याचा मित्र सोबत होता. दोघे दुचाकीवरुन जात होते. मनिष मागे बसला होता. या दरम्यान मनिषला सापानं दंश केला. मित्रानं दुचाकी लगेचच रस्त्याच्या कडेला लावली.. सर्पदंशानं कळवळलेला तरुण रस्त्यावर पडला. काही सेकंदांनंतर तो उभा राहिला. पण त्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये तो पुन्हा कोसळला. यावेळी त्याचा मित्र असहायपणे त्याच्याकडे पाहत होता. घटनास्थळी असलेल्या लोकांनी मनिषला जिल्हा रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. स्थानिकांनी थोड्या वेळानं सर्पमित्राला बोलावलं. त्याला सापाला पकडून दूर असलेल्या जंगलात सोडलं. तरुणाला दंश करणारा साप कोब्रा प्रजातीतील होता, अशी माहिती सर्पमित्रानं दिली. छिंदवाड्यात दोन वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. शहरापासून १५ किलोमीटर दूर असलेल्या मानकादेही खुर्द गावात राहणारा तरुण एका घरात रसेल वायपर पकडत होता. यावेळी तरुण सापासोबत खेळू लागला. आसपासच्या लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरुणानं ऐकलं नाही. तितक्यात सापानं त्याच्या डाव्या हाताला दंश केला. तरुणाची प्रकृती बिघडली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात नेलं. तिथून त्याला नागपूरला हलवण्यात येतं. मात्र रस्त्यातच त्यानं अखेरचा श्वास घेतला

COMMENTS