Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंकजा मुंडेंच्या कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त

जीएसटी विभागाची वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई

बीड/प्रतिनिधी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाने मोठा दणका दिला आहे. त्यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई कर

केंद्र सरकारने तरी महाराष्ट्राला किती मदत करायची..? पंकजा मुंडेंचा सवाल
भगवान जगन्नाथ यांच्या 144 व्या रथ यात्रेस मंजूरी l
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट

बीड/प्रतिनिधी : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना जीएसटी विभागाने मोठा दणका दिला आहे. त्यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करत कारखान्याची तब्बल 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या पूर्वी देखील या कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतरची करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. पक्षात होणारी घुसमट तसेच त्यानंतर त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी विभागाने या कारखान्या भोवती फास आवळला आहे. या पूर्वी देखील या कारखान्यावर एप्रिल महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटी रुपयांचा सरकारचा जीएसटी कर बुडवल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कारखान्याची चौकशी सुरू होती. या पूर्वी एप्रिल महिन्यात कारखान्यावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शनिवारी कारखान्याला नोटिस बजावली होती. दरम्यान, कारखान्याची जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचे एक पत्रक कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जीएसटी विभागाने लावले आहे. येथील बॉयलर हाऊस आणि इतर मशनरी जीएसटी विभागाने जप्त केले आहे. दरम्यान, या यंत्रांचा लिलाव करून 19 कोटी रक्कम वसूल केली जाणार आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीत हा कारखाना उभा केला होता. सर्वाधिक गाळप करणारा कारखाना म्हणून याची ओळख होती. मात्र, आता हा कारखाना आर्थिक डबघाईला आला आहे. कोरोना काळात या कारखान्यात तयार झालेली साखर ही थेट व्यापार्‍याला विकण्यात आली होती. मात्र या व्यवहाराची जीएसटीची रक्कम केंद्र सरकारकला भरण्यात आली नव्हती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS