Homeताज्या बातम्यादेश

गणपती विसर्जन करताना राजकोट धरणात काका पूतण्याचा बुडून मृत्यू

गुजरात प्रतिनिधी - महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून गणपती विसर

रस्ते अपघात कमी करण्याच्या कार्यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
कर्नाटक निवडणुकीचा बिगुल वाजला
कर्जतच्या तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

गुजरात प्रतिनिधी – महाराष्ट्राप्रमाणेच देशभरात विविध ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून गणपती विसर्जनावेळी अनेकदा घडत असलेल्या दुर्दैवी घटना इतर राज्यांमध्येही पाहाला मिळतात. अशाच एका घटनेत गणपती विसर्जन करतेवळी काका पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुजरातमधील राजकोट धरणात गणेशविसर्जनावेळी ही घटना घडली. राजकोटमध्ये शहरातील कोठारिया रोडवर असलेल्या मणिनगर सोसायटीतील रहिवाशांसोबत ही घटना घडली. विसर्जन सोहळ्यासाठी आजी धरणाजवळ सोसायटीतील रहिवासी जमले होते. गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन जण नदीत गेले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत पीडितांचे मृतदेह ताब्यात घेतले.

COMMENTS