जामखेड/प्रतिनिधी ः पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर चहाची टपरी चालवुन उपजीविका करणार्या खर्डा येथील श्रीमती हेमलता निकम यांच्या मुलीला शिक्षणासाठी आ

जामखेड/प्रतिनिधी ः पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर चहाची टपरी चालवुन उपजीविका करणार्या खर्डा येथील श्रीमती हेमलता निकम यांच्या मुलीला शिक्षणासाठी आमदार रोहित पवार यांनी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात दिला. आमदार रोहित पवार यांनी खर्डा येथील अपघाती मृत्यू झालेल्या बाळू निकम यांच्या मृत्यूची सहानभूतीपूर्वक चौकशी करून इंजिनिअरिंगला शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या शैक्षणिक वर्षाची 46 हजार रुपये फी देऊन मदतीचा हात दिल्याने खर्डा परिसरात भावूक वातावरण निर्माण झाले.
याबाबत माहिती अशी की, आमदार रोहित पवार हे खर्डा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमाला आले असता निकम कुटुंबाला भेट दिली. यावेळी पत्रकार दत्तराज पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य दादा जमकावळे, प्रकाश गोलेकर, श्रीकांत लोखंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुनील लोंढे कल्याण सुरवसे, राजुभाई सय्यद, राजू लोंढे इत्यादी उपस्थित होते.
COMMENTS