Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परमार्थात कान तर संसारात डोळे उघडे ठेवले पाहिजे ः हभप अरूण महाराज

अकोले/प्रतिनिधी ः परमार्थात कान अन संसारात डोळे उघडे ठेवले तर मनुष्य जीवनात यशस्वी होतो असे मत ह.भ.प. अरुण महाराज शिर्के, कळस यांनी द्वितीय दिवसा

18 वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद
बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करणार्‍याला अटक
बेलापूर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

अकोले/प्रतिनिधी ः परमार्थात कान अन संसारात डोळे उघडे ठेवले तर मनुष्य जीवनात यशस्वी होतो असे मत ह.भ.प. अरुण महाराज शिर्के, कळस यांनी द्वितीय दिवसाची कीर्तन पुष्प गुंफताना व्यक्त केले. काम क्रोध माझे लवियेले पाठी। बहुत हिम्पुटी झालो देवा । या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना शिर्के महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या परमपूज्य सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात आयोजित अखंड हरीनाम सप्ताह तथा ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.
यावेळी चेमदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल महाराज तळपे, कैलास महाराज आहेर, हभप मृदंगाचार्य ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, संकेत महाराज आरोटे, गायकवृंद रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे, हार्मोनियम वादक देवचंद वाकचौरे, विणेकरी गंगा बाबा वाकचौरे हे उपस्थित होते. यावेळी चामदेव शिक्षण संस्थेचे विध्यार्थी यांनी अतिशय मनमोहक संगीत साथ दिली. शिर्के महाराज म्हणाले की, जगात सुखी कोणीच नाही, देवाने मानवाला सर्व भोग निर्माण केले. इंद्रीय वरती स्वामित्व मानवाचे नाही. कामाने अनेक ऋषी मुनी फसले आहेत. वारकरी संप्रदाय हा चिरकाल टिकणारा आहे. आई वडिलांची सेवा करावी असेही त्यांनी सांगितले. ह.भ.प. देवा महाराज वाकचौरे कळस यांनी प्रवचन सेवा केली. श्रीमती यशोदा ढगे व कळसचे उपसरपंच केतन प्रकाश वाकचौरे यांनी संतपंगत दिली. यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे यांनी संतपंगत देणार्‍यांना केसरी आंबाचे रोपे वाटप केले.

COMMENTS