Homeताज्या बातम्यादेश

भारतीय संघाच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारत आयसीसीच्या तीनही फॉरमॅटमध्ये नंबर 1 वर

नवी दिल्ली प्रतिनिधी - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. टीम इंडियाचा कार्यवाहक कर

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता (Video)
भारतीय संघाने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रचला ‘सुवर्ण’ इतिहास
पावसाने हिरावला दक्षिण आफ्रिकेचा विजय

नवी दिल्ली प्रतिनिधी – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. टीम इंडियाचा कार्यवाहक कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 276 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 48.4 षटकात 281 धावा करत सामना जिंकला. या विजयासह भारत आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो आधीच टी-20 आणि कसोटीत अव्वल होता. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनला आहे. कर्णधार के एल राहुलच्या निर्देशनाखाली जिंकून टीम इंडियाने  इतिहास घडवला. एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणारा तो दुसरा संघ ठरला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली होती. ऑगस्ट 2012 मध्ये तो एकाच वेळी कसोटी-ODI आणि T20 मध्ये पहिल्या क्रमांकावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 116 रेटिंग गुण गाठले. पाकिस्तानला पहिले स्थान मिळवून मागे टाकले. पाकिस्तानी संघाचे 115 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्याचे 111 रेटिंग गुण आहेत

COMMENTS