Homeताज्या बातम्यामनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी - मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा आणि मराठी

झारखंडमध्ये पाच माओवाद्यांचा खात्मा
दुर्दैवी ! लोकलच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू I LOKNews24
Raj Thakarey : एसटीला फायद्यात आणण्यासाठी राज ठाकरेंनी सांगितला उपाय | LOKNews24

मुंबई प्रतिनिधी – मराठी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांचे आजोबा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते अरविंद काणे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. अरविंद काणे मराठी रंगभूमीसह टेलिव्हिजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी नात गौतमी देशपांडेसोबत ‘माझा होशील ना’ या मालिकेमध्ये काम केलं होतं. आजोबांच्या निधनाचं वृत्त स्वत: अभिनेत्री गौतमीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे.

गौतमीने आजोबांसाठी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून दोन्ही बहिणींचंही आजोबांसोबत नातं कसं होतं, हे सांगितंल आहे. अरविंद काणे यांनी १९५३ पासून मराठी रंगभूमीवर काम करण्यासाठी सुरुवात केली. अभिनेत्रीने शेअर केलेली आजोबांची भावूक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

COMMENTS