Homeताज्या बातम्यादेश

महिला आरक्षणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ः राहुल गांधी

नवी दिल्ली ः मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पारित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत महिला विधेयक मां

संगमनेरमध्ये खा. राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचा निषेध
राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा

नवी दिल्ली ः मोदी सरकारने बोलवलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पारित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत महिला विधेयक मांडले होते ते बहुमताने पारित करण्यात आले. या आरक्षणावरुन काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. ओबीसींच्या मुद्द्यावरुन खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला करतांना भाजप ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ओबीसी समाजाबद्दल काय केले असे म्हणत फक्त 3 टक्केच ओबीसी सचिव का आहेत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच देशात पाच टक्क्याहून ओबीसी समाज आहे असे पकडू मात्र पाच टक्क्यांहून अधिक ओबीसी समाज असेल, तर तो किती आहे, हे कळले पाहिजे. आणि मी एखादी गोष्ट ठरवली, तर केल्याशिवाय सोडत नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी यावेळी दिला.   

COMMENTS