Homeताज्या बातम्यादेश

लोकसभेत भाजप खासदाराची शिवीगाळ

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी मागितली माफी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसदेमध्ये अनेकवेळेस खासदारांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, मात्र शिवीगाळ करण्याचा आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रकार

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील शेकडो ग्रामस्थ शेतकरी बसले आमरण उपोषणाला
सुषमा स्वराज यांची कन्या सक्रिय राजकारणात
बीडमध्ये तलवार व सुरा घेऊन फिरणार्‍याला पकडले

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः संसदेमध्ये अनेकवेळेस खासदारांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे, मात्र शिवीगाळ करण्याचा आणि आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी भर लोकसभेत बहुजन समाज पक्षाच्या खासदारावर आक्षेपार्ह आणि शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लोकसभेत माफी मागावी लागली आहे.
संसदेतील या विशेष अधिवेशनातला हा व्हिडीओ असून यात भाजपा खासदार रमेश बिधुरी भाषण करताना दिसत आहेत. चांद्रयान मोहिमेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाटल्याचा आरोप विरोधी बाकांवरून करण्यात आल्यानंतर त्यावर बिधुरी चांगलेच भडकले. रागाच्या भरात त्यांनी थेट शिवीगाळ करायला सुरुवात केली. हे सगळे हे बिधुरी बसपाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून म्हणत असल्याचे सांगितले जात आहे. रमेश बिधुरी यांनी आपल्या भाषणात मोदींनी श्रेय लाटले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, यावर विरोधी बाकांवरून काही टिप्पणी होऊ लागताच बिधुरी भडकले. मोदीजी श्रेय घेत नाहीयेत. श्रेय देशाचे वैज्ञानिक घेत आहेत. ए भ**ए उग्रवादी..बोलू देणार नाही तुला कधी उभे राहून. सांगून ठेवतोय. ए उग्रवादी..कठुवेहे दहशतवादी आहेत उग्रवादी आहेत.. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचे काही ऐकू नका, बाहेर फेका याला, असे रमेश बिधुरी म्हणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

COMMENTS