Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्थिक बचतीचा मंत्र विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी महत्वाचा ः अभय आव्हाड

पाथर्डी/प्रतिनिधी ः श्री गणेश चतुर्थी व गौरी गणपती या उत्सवाचे औचित्य साधून पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर

नगर तालुका बाजार समितीच्या 18 जागांसाठी 228जण रिंगणात
पत्रकारांनी नव्या संधीचा शोध घेतला पाहिजे – वसंत मुंडे
नेवासा तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढणार : ना. शंकरराव गडाख

पाथर्डी/प्रतिनिधी ः श्री गणेश चतुर्थी व गौरी गणपती या उत्सवाचे औचित्य साधून पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर पाथर्डी या शाळेत सर्व विद्यार्थ्यांसाठी चैतन्य मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या माध्यमातून विद्यार्थी बचत बँक स्थापन करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून हा प्रेरक उपक्रम विद्यालयात वर्षभर राबविण्यात येणार आहे. शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांना आर्थिक बचतीचा मंत्र दिल्यास तो विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो तसेच शालेय अभ्यासक्रमा बरोबर विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देणे हे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे व ती काळाची गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
 सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून पैशांची बचत करावी व आपल्याला अडचण असल्यास त्या पैशांचा वापर योग्य कारणांसाठी करण्यात यावा. सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकासमवेत चर्चा करून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी चैतन्य समूहाचे संचालक अनंत ढोले म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन बचत करण्यास शिकावे व आपल्या आई-वडिलांना अडचणीच्या वेळी मदत करावी तसेच विद्यार्थ्यांना बचत करण्यासाठी बँकेकडून एक बॉक्स दिला जाईल व बचत झालेली रक्कम विद्यार्थी व पालक यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल ती रक्कम विद्यार्थ्यांना किंवा संबंधित पालकांना केव्हाही काढता येईल अशा प्रकारे उपक्रमाची माहिती दिली.या उपक्रमाची सर्व पालक वर्गातून स्वागत करण्यात आले. तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बँकेतील अनेक व्यवहार ज्ञान मिळणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड, चैतन्य ग्रुपचे संचालक अनंत ढोले, विद्यालयाचे समन्वयक ज्ञानेश्‍वर गायके, मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी, जयश्री एकशिंगे, आशा बांदल, राधिका सरोदे, कीर्ती दगड खैर, ज्योती हंपे, ऋषिकेश मुळे व पालक तसेच बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुजा कुलकर्णी तर सूत्रसंचालन मनीषा गायके यांनी केले तर आभार वर्षा ढाकणे यांनी मानले.

COMMENTS