Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विसर्जनासाठी गेलेल्या तीन गणेशभक्तांचा मृत्यू

पालघर/प्रतिनिधी ः मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच आता पालघरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करायला

काष्टीत 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पिस्तुल चोरी
शहीद नायब सुभेदार जयसिंग शंकर भगत यांच्यावर शासकीय लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
प्राथमिक सुविधांच्या उपलब्धतेवर भर -राज्यमंत्री डॉ भारती पवार 

पालघर/प्रतिनिधी ः मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच आता पालघरमधून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करायला गेलेल्या तीन गणेशभक्तांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीत ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
जगत मौर्य, सूरज प्रजापती आणि प्रेम रतन अशी तिन्ही मृतांची नावे आहे. हे सर्व उत्तर प्रदेशातील असून पालघरमध्ये ते कामाच्या निमित्ताने आलेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात कोनसई या गावात राहणार्‍या तीन परप्रांतीय मजुरांनी दीड दिवसांचा गणपती बसवला होता. दीड दिवस संपल्यानंतर गणेशभक्तांनी गणपतीच्या विसर्जनाची योजना आखली. त्यासाठी जगत, प्रेम आणि सूरज हे वैतरणा नदीत उतरले. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर नदीतील खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही नदीच्या धारेत बुडाले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती समजताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिन्ही गणेशभक्तांचा मृत्यू झालेला होता. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बुडालेल्या तिन्ही गणेशभक्तांना नदीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी तिघांच्याही मृतदेहांची ओळख पटवली आहे. तसेच गणेशभक्तांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मुंबई, ठाण्यासह उपनगरांच्या भागांमध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी हौद आणि तलावांची सोय केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी, समुद्र किंवा तलावातील धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS