मुंबईत पहिला ऑक्सिजन प्रकल्प; गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत पहिला ऑक्सिजन प्रकल्प; गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट सुरू

गोवंडीच्या पं. मदनमोहन मालविय शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले आहे. आरसीएफच्या सीएअसार निधीतून रुग्णालयात हे युनिट उभारण्यात आले असून मुंबईतील पहिला ऑक्सिजन प्रकल्प आहे.

कथनी आणि करणीतील फरक
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला मुस्लीम समाजाची ऍलर्जी, अन्यथा लोकशाही मार्गाने इलाज करू:- सुफियान मनियार
दारूच्या दुकानावर चोरांचा डल्ला, दीड लाख रुपये लंपास | LOKNews24

मुंबई : गोवंडीच्या पं. मदनमोहन मालविय शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले आहे. आरसीएफच्या सीएअसार निधीतून रुग्णालयात हे युनिट उभारण्यात आले असून मुंबईतील पहिला ऑक्सिजन प्रकल्प आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट कार्यान्वित करण्यात आले. यामुळे शताब्दीसह पूर्व उपनगरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या सुटण्यास मदत होईल. 

    महाराष्ट्रात रुग्णाला ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरावठ्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे आवाहन केले होते. खा. राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी यांसारख्या आस्थापनांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आरसीएफ कंपनीच्या सीएसआर निधीतून गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट कार्यान्वित करण्यात आले. या ऑक्सिजन जनरेटर युनिटद्वारे दिवसाला 9 किलो क्षमतेचे सुमारे 102 ऑक्सिजन सिलेंडर्स भरू शकतील इतक्या ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनअभावी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी मी केलेल्या आवाहनाला आरसीएफकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या ऑक्सिजन युनिटमुळे पूर्व उपनगरातील रुग्णालयांना दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया खा. शेवाळे यांनी दिली.

COMMENTS