मुंबई प्रतिनिधी - प्रसिद्ध यू-ट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने तीच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करु
मुंबई प्रतिनिधी – प्रसिद्ध यू-ट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिने तीच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन प्राजक्ताने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. प्राजक्ता कोळीने आपला एक्स बॉयफ्रेंड वृशांक खनालसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सकाळी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन प्राजक्ताने साखरपुड्याची माहिती दिली आहे. त्यानंतर या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. प्राजक्ता कोळीने अचानक साखरपुड्याची घोषणा केल्याने सेलिब्रिटींसोबतच तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये दोघेही मोठ्या आनंदात दिसत आहेत. प्राजक्ता अनेक वर्षांपासून वृशांक खनालसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. साखरपुड्याची घोषणा करुन फोटो शेअर केला आहे.
COMMENTS