अहमदनगर/प्रतिनिधी ः जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने शेतकरी हवालदार झाला असून, पावसाअभावी पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळाची
अहमदनगर/प्रतिनिधी ः जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने शेतकरी हवालदार झाला असून, पावसाअभावी पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती जाणवू लागल्याने शेतकर्यांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे असे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. शहरातील राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले की, शेतकर्यांपुढे उभे राहिलेल्या आव्हानाला प्रतिकार करण्याऐवजी सरकार शासन आपले दारी राबवून राजकीय स्वतःची राजकीय प्रसिद्धी करीत आहे. त्यावर शासनाचा कोट्यावधीचा खर्च होत आहे. एक रुपयात पिक विमा योजना सांगून प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी करताना शेतकर्यांच्या तोंडाला आश्वासनाची पाणी पुसली, असे चित्र दिसत आहे. या योजनेत 90 ते 95 टक्के महसूल फरक पडला आहे. या योजनेमध्ये एक महत्त्वाची अट म्हणजे ती पाहणे गरजेचे आहे, परंतु प्रत्यक्षात 25 टक्के क्षेत्राची ही व्यवस्थित पाहणी होत नाही, त्यामुळे इतर 95 टक्के नागरिक शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याचे दिसते. त्यामुळे शासनाचा हा फक्त दिखावा आहे असे स्पष्ट झाले आहे. शासनाने पीक पाहण्याची अट शिथिल करावी व तसे त्याबाबतचे आदेशही द्यावेत शेतकर्यांचा मात्र सरकारवर विश्वास राहिलेला नाही. शासन फक्त घोषणा करते प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने हे सरकार गतिमंद असल्याचे प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारची घर घर जल योजना फक्त कागदावरच राहिली अशा परिस्थितीत शेतकरी जनावरांच्या चारा प्रश्न त्रस्त असताना जनावरांचे लंबी आजाराचा धोकाही त्यांच्यावर लटकत असताना छावणीमध्ये जनावर ठेवण्यास शेतकरी धजावत नाही सरकारच्या अनेक प्रकल्पांचे काम बंद पडले. त्यामुळे शेतकर्यांसोबत सर्वसामान्य नागरिकांचाही या सरकारवर विश्वास राहिला नाही असेही आमदार तनपुरे यांनी म्हटले यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, डवोकेट रवींद्र शितोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यात 85 टँकरने पाणीपुरवठा – जिल्ह्यात पाणी टंचाई भेडसावू लागल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा सुरु केला. यासाठी जिल्ह्यातील एक लाख 67 हजार नागरिकांकरिता एकूण 85 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यात 12, नगर तालुक्यात 12, पारनेर तालुक्यात 28, पाथर्डी तालुक्यात 18, कर्जत तालुक्यात 2, जामखेड तालुक्यात 2, व पारनेर नगरपंचायत येथे 11 टँकरने पाणीपुरवठा केला जातो अशी माहिती तहसीलदार देवतरासे यांनी दिली.
COMMENTS