Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्राहक संरक्षण संस्थेचे आमकर यांनी अकोल्यात घेतला आढावा

अकोले/प्रतिनिधी ः लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी नुकतीच अकोले तालुक्यात भेट देऊन त्यांनी

सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठलाग, दोघांवर गुन्हा दाखल
समता स्कूलची दहावीच्या उज्जवल निकालाची परंपरा कायम
…तर, महावितरण कंपनी बंद होईल ; महावितरणने मांडले वास्तव

अकोले/प्रतिनिधी ः लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्यचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी नुकतीच अकोले तालुक्यात भेट देऊन त्यांनी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी राज्य संघटक सुभाष धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ बाळसराफ, तालुकाध्यक्ष संतोष तिकांडे उपस्थित होते.
दिनकर आमकर यांनी या निमित्ताने अकोले येथील उद्योजक भारत पिंगळे यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांचा शाल, पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य संघटक सुभाष धुमाळ,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ बाळसराफ, तालुकाध्यक्ष संतोष तिकांडे,अकोले ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, सेवा निवृत्त प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, शांताराम वैद्य, आदर्श शिक्षक भाऊसाहेब कासार, दत्तात्रय धुमाळ, सौ. संगीताताई पिंगळे उपस्थित होते. यावेळी दिनकर आमकर यांनी ग्राहक संरक्षक संस्थेच्या कामाविषयी चर्चा केली. व लवकरच अकोले तालुक्यात ग्राहक सेवा मॉल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या मॉलमध्ये कमी  दरात वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र या साठी 1000 सभासद नोंदणी होणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

COMMENTS