कोपरगाव प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती न
कोपरगाव प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी भारतीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त कोपरगाव मध्ये विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भव्य दिव्य पदयात्रेत शेतकरीसह युवक वर्गानी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध ठिकाणी झालेले उत्स्फूर्त स्वागतासह भारत जोडो यात्रा ही देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देणारी ठरली असून सर्व रेकॉर्ड मोडणार्या या यात्रेचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. जाती धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केले.
काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त कोपरगाव शहरात विराट पदयात्रा झाली. या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी सभेत व्यासपीठावर राज्य महिला आयोग सदस्या तथा महिला काँग्रेसच्या सचिव उत्कर्षाताई रुपवते, जिल्हा काँग्रेस ज्येष्ठ नेत्या सौ. लताताई डांगे, रवींद्र साबळे तालुका काँग्रेस सरचिटणीस, छोटु भाई पठाण अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, यादवराव त्रिभुवन आ.जा. तालुकाध्यक्ष, विष्णू पाडेकर किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष, विजय मोरे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कोपरगाव तालुकाध्यक्ष आकाश नागरे प्रास्ताविक करताना म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. मनिपुर अशांत आहे, महिलांवर सर्वत्र अत्याचार होत आहे. पंजाब मध्ये शेतकरी आंदोलनामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले .कुस्तीगीर मुलींचे आंदोलन दडपले गेले.मराठा, धनगर, यांचे सह विविध समाजाचे आंदोलन दडपले जात आहे . देशापुढे अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार मूळ प्रश्नांवर भर देण्याऐवजी जनतेचे लक्ष इतरत्र विचलित करत आहे.इडी व सीबीआय यासारख्या स्वायत्त संस्थांच गैरवापर होत असुन लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीने एकत्र येऊन भाजप पुढे मोठे आव्हान निर्माण केल्याने भाजपाच्या तंबुत भितीचे वातावरण तयार झाले आहे. आगामी काळात देशात व राज्यात परिवर्तन नक्कीच असुन कोपरगावसह राज्यात काँग्रेसला चांगले दिवस येणार आहे. काँग्रेस पक्षाला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आयुष्याची दहा वर्ष तुरुंगात काढली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले असल्याचे आकाश नागरे म्हणाले.
COMMENTS