Homeताज्या बातम्याविदेश

नायजेरियात भीषण अपघात, बोट उलटून 26 जणांचा मृत्यू

नायजेरिया प्रतिनिधी - नायजेरियात बोट अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून, काहींचा शोध सुरू आहे. नायजे

बारामतीत बस अपघातात 27 विद्यार्थिनी जखमी
गरोदर महिलांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा अपघात
अपघातात तीन महिला भाविकांसह चौघांचा मृत्यू

नायजेरिया प्रतिनिधी – नायजेरियात बोट अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले असून, काहींचा शोध सुरू आहे. नायजेरियात रविवारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील नायजर प्रांतातील मोकवा येथे बोटीतून प्रवास करताना बुडून मृत्यू झालेल्या लोकांमध्ये बहुतांश महिला आणि मुले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या भागात गेल्या तीन महिन्यांतील हा दुसरा अपघात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नायजेरियाचा हा भाग अतिशय मागासलेला आहे.

नायजेरियाच्या नायजर राज्याच्या गव्हर्नरचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी सांगितले की, अपघात झालेल्या बोटीवर 100 हून अधिक लोक होते. बोटीत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. मोकवा नावाच्या ठिकाणी हा अपघात झाल्याचे प्रवक्त्याने सांगितले. इब्राहिम पुढे म्हणाले की, बोट दुर्घटनेत प्राण गमावलेले आणि बेपत्ता झालेले लोक धरण ओलांडून आपापल्या शेतात जात होते. अशा परिस्थितीत बहुतांश लोक शेतकरी असल्याचे मानले जाते. 

COMMENTS