Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोज जारांगे यांच्या उपोषणाला निमगाव को. ग्रामस्थांचा पाठिंबा

राहाता /प्रतिनिधीः  जालन्यातील आंतरवली सराटी येथे झालेल्या मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज या घटनेच्या निषेध व्यक्त करून मनोज

पेन्शन मंजूर, पण ना-हरकत दाखल्यासाठी हेलपाट्यांची वेळ ; रयतच्या निवृत्त मुख्याध्यापकाचे उपोषण
पैशाचे आमिष दाखवून वृद्धाचे 91 हजाराचे दागिने पळवले
जयहिंद लोकचळवळ व कर्‍हेश्‍वर विद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

राहाता /प्रतिनिधीः  जालन्यातील आंतरवली सराटी येथे झालेल्या मराठा समाजातील आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज या घटनेच्या निषेध व्यक्त करून मनोज जारांगे यांच्या उपोषणास सकल मराठा समाज निमगाव को गावातील ग्रामस्थांनी पाठिंबा देण्यात आला आहे. मनोज जारांगे यांच्या उपोषणाचा 12 वा दिवस उजाडला.तरी राज्यातील शासनाने धोरणात्मक निर्णय न झाल्याने ठिकठिकाणी  आता नाराजी व्यक्त केली जात आहे. जालन्यातील आंतरवली सराटी गावातील उपोषणास राज्यभरातून मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यात येत आहे.

 तर जालन्यामधील मनोज जारांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राहाता तालुक्यातील कोल्हार येथील सहा तरुणांनी गेल्या चार दिवसापासून उपोषण करण्यात येत आहे. या दोन्ही उपोषणास सकल मराठा समाज निमगाव को गावातील ग्रामस्थांनी या आंदोलनास एकमुखी पाठिंबा दिला आहे. यावेळी भानुदास कातोरे,संजय कातोरे,अँड गोकुळ ठुबे,सागर कातोरे ,गोरख खरात,राजेंद्र कातोरे ,रावसाहेब जगताप,कृष्णा कातोरे,आप्पासाहेब वदक,प्रवीण कातोरे,सुमित वदक, दीपक वदक,दशरथ गुजर,भूषण कातोरे,अक्षय कातोरे,आदी उपस्थित होते.

COMMENTS