Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पर्यावरण पूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती बनविणे या कार्यशाळाचे आयोजन – आ. मोनिका राजळे 

पाथर्डी प्रतिनिधी - आदि फौंडेशन आदिनाथनगर व ग्रीन क्लब श्री आनंद कॉलेज पाथर्डी यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यासाठी पर्यावरण पूरक

पाण्याच्या वादातून कोयत्याने वार
दुःखमुक्तीसाठी समाजाला बुद्धांच्या विचारांची गरज ः प्रा. महेंद्र मिसाळ
ते मेसेज व्हायरल केले तर…याद राखा

पाथर्डी प्रतिनिधी – आदि फौंडेशन आदिनाथनगर व ग्रीन क्लब श्री आनंद कॉलेज पाथर्डी यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यासाठी पर्यावरण पूरक शाडू / मातीची श्री गणेश मूर्ती बनविणे या कार्यशाळेचे दि. ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत लोकनेते आप्पासाहेब राजळे मंगल कार्यालय, कोरडगांव रोड, पाथर्डी येथे आयोजन केले आहे. ही कार्यशाळेचे दोन गटात आयोजन केले असून शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत लहान गट व रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी इयत्ता ६ वी ते १२ वी मोठा गट अशा पध्दतीचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत शहरातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होत असून पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती बनवून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देणार आहेत.

श्री गणेश मूर्ती बनविणे या कार्यशाळेचे उद्दघाटन पाथर्डी शहरातील प्रसिध्द मूर्तीकार लक्ष्मीकांत बीडकर व रघुनाथजी पारखे यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे. या कार्यक्रमास पाथर्डी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व माजी पदाधिकारी, विविध शाळेचे प्राचार्य तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व पर्यावरण प्रेमी उपस्थीत राहणार आहेत.

COMMENTS