Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैद्यकीय प्रवेशासाठी 10 लाखाची लाच घेणारा डीन ताब्यात

पुणे : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या डीन डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार यांची अ

जायकवाडीच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील
तहानलेल्या शाकीरदरावाडीचा पिण्याच्या पाण्याचा संघर्ष संपला
राणेंच्या अटकेचे आदेश काढणारे पोलीस अधिकारी गेले राज ठाकरेंच्या भेटीला… म्हणाले…

पुणे : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या डीन डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार यांची अखेर पालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात डीन आशिष बनगिनवार कार्यरत होते. वैद्यकीय प्रवेशासाठी बनगिनवार यांनी 16 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 10 लाख रुपये घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यानंतर मोठा गोंधळ अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय झाला होता. विद्यार्थी संघटनेने याबाबत संताप व्यक्त केला होता.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अटल बिहारी वाजपेयी विद्यालयात तोडफोड देखील केली होती. महापालिकेच्या मालकीचे एखादे वैद्यकीय महाविद्यालय असावे, त्यात गरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने पालिकेने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. तिथे महाविद्यालयाचे डीन म्हणून बनगिनवार यांची निवड केली होती. महाविद्यालय संचलित करण्यासाठी शिक्षण ट्रस्ट स्थापन केलं आहे. त्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, सर्व पक्षांचे नेते, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, आरोग्य विभागप्रमुख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता, शहर अभियंता, विधि सल्लागार यांचा समावेश आहे. मागील सव्वा वर्ष महापालिकेचे सभागृहच अस्तित्वात नाही. त्यामुळे या ट्रस्टवर सध्या केवळ प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यामुळेच महाविद्यालयात बरेच गैरप्रकार सुरू असल्याचे बोलले जात होते. लाच प्रकरणाने त्याला पुष्टीच मिळाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात आशिष बनगिनवार दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS