हैदराबाद ःग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना

हैदराबाद ःग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या पश्चात दोन मुली आहेत.मालिनी राजूरकर यांचे ‘ख्याल’ आणि ‘टप्पा’ या गायन प्रकारांवर विशेष प्रभुत्व होते. अभिजात संगीताच्या प्रचारासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. ग्वाल्हेर घराण्याची परंपरा समृद्ध करणार्या वझेबुवा आणि त्यांचे गुरुजी निसार हुसेनखाँ, भूगंधर्व रहिमतखाँ, वासुदेवबुवा जोशी, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, ओंकारनाथ ठाकूर यांची परंपरा कायम ठेवणारा आवाज म्हणून त्यांची ख्याती होती.
COMMENTS