Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार राजू कोरमोरे यांना धमकी

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. राजू कोरमोरे हे तुमसर मतदार संघातील आमदार आह

हिंदूंनो, हिंदूत्वापासून सावध व्हा !
जातीय तेढ निर्माण केल्यास कारवाई : पोलिस महासंचालक रजनीश सेठ
कुपोषित बालकांच्या पालकांना कोंबड्यांचे वाटप 

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांना धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. राजू कोरमोरे हे तुमसर मतदार संघातील आमदार आहे. त्यांना एका टॅक्सी चालकाने धमकवल्याची घटना समोर आली आहे. या प्ररकणी त्यांनी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सतेच पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मतदार संघातील आमदार राजू कोरमोरे यांना एका टॅक्सी चालकाने धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजू कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार राजू कोरमोरे हे टॅक्सीने वाकोला जंक्शन सांताक्रूझ येथून आमदार निवास कुलाबा येथे जात होते. रस्त्यामध्ये टोलचे पैसे देण्यावरून त्यांचा वाद झाला. त्यानंतर टॅक्सी चालकाने आमदार राजू कोरमोरे यांना धमकावले इतकेच नाही तर टॅक्सी चालकाने कोरमोरे यांना टॅक्सीतून खाली उतरवले. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

COMMENTS