Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत आढळला झिकाचा दुसरा रुग्ण

मुंबई : मुंबईत झिका विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली. मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणार्‍या 15 वर्षा

नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण ः आ. थोरात
मंत्रालयाच्या छतावर जाऊन मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सचिन धस यांची रणजी ट्रॉफी साठी निवड

मुंबई : मुंबईत झिका विषाणूचा दुसरा रुग्ण आढळला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतची माहिती देण्यात आली. मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणार्‍या 15 वर्षाच्या मुलीला झिका विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिला बाकीही दीर्घकालीन आजार आहेत. याआधी चेंबूर परिसरात झिका विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. मुंबईतच दुसरा रुग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिंता अधिकच वाढली आहे. याआधी चेंबूरमध्ये 79 वर्षी वृ्द्ध व्यक्तीला झिका विषाणूची लागण झाली होती. 23 ऑगस्टला मुंबई महापालिकेने याबाबतची माहिती दिली होती. 

COMMENTS