जामखेड/प्रतिनिधी ः तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दूष्काळाची छाया गडद होतांना दिसत आहे. नैसर्गिक संकटे टाळुन चांगला पाऊस पडावा
जामखेड/प्रतिनिधी ः तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दूष्काळाची छाया गडद होतांना दिसत आहे. नैसर्गिक संकटे टाळुन चांगला पाऊस पडावा. या मागणीसाठी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले.
खर्डा येथील मुस्लिम समाजाने कानिफनाथ टेकडी शेजारील ईदगाह मैदानावर नमाज पठण करून अल्लाहला पावसासाठी साकडे घातले.यावेळी सर्वांनी अल्लाहकडे दुवा मागून बरसता नही देखकर अब रे रहेमत, बदो पर भी बरसा दे बरसाने वाले अशी दुवा अल्लाहकडे मागितली.यावर्षी पावसाळा होऊन सुमारे तीन महिने होत आले आहेत. तरी अद्यापपर्यंत खर्डा व परिसरात मोठा पाऊस पडला नाही. पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरिपाची पिके गेली आहे. पाऊस नसल्याने पुढील काळात शेतकर्यांपुढे पशुधन वाचवणे व इतर पिके व शेती संदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शेतातील खरिप हंगामाची सर्व पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण बिघडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे.यासाठी मुस्लिम ईदगाह मैदानावर जामा मस्जिदचे हाफिज साहेब नियाज अहमद व मोमीन मज्जिद येथील हाफिज साहब अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करून पाऊस पडण्यासाठी अल्लाहला साकडे घातले.यावेळी खर्डा शहरातील बहुसंख्य मुस्लिम समाज उपस्थित होता.
COMMENTS