Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणासाठी धनगर समाज मैदानात

शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार

बीड/प्रतिनिधी ः राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित असून, याप्रकरणी जालना जिल्ह्यात मराठा समाजाकडून उपोषण सुरू असतांन, आता आरक्षणासाठी धनगर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी
प्रा. हाके यांच्यावर झुंडशाहीचा हल्ला गंभीर!
सावध व्हा! बनावट व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे होतोय आधार स्कॅम

बीड/प्रतिनिधी ः राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित असून, याप्रकरणी जालना जिल्ह्यात मराठा समाजाकडून उपोषण सुरू असतांन, आता आरक्षणासाठी धनगर समाज मैदानात उतरल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. कारण आता यशवंत सेनेचे धनगरांना तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने धनगरांना आरक्षण न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा यशवंत सेनेकडून शिंदे-फडणवीस सरकारला देण्यात आला आहे. त्यामुळे आता यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बीज जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन गावात बिरुबा देवाच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनार यांनी उपस्थिती लावत धनगर समाजाचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्‍न प्रलंबित आहे, शिंदे-फडणवीस सरकारने तातडीने धनगरांना आरक्षण जाहीर करायला हवे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिबवा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. विरोधकांच्या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी आंदोलकांची माफी मागितली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहे. मराठा आंदोलनावरून राजकीय वाद पेटलेला असतानाच आता धनगरांना आरक्षण देण्याची मागणी होत असल्याने त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

COMMENTS