Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळीच्या विनोद निकोलेची महाराष्ट्र सिक्युरिटी पोलिस फोर्समध्ये निवड

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी रिक्षाचालक जनार्दन निकोले यांचा मुलगा विनोद निकोले यांची नुकतीच महाराष्ट्र सिक्युरिटी

राहुरीत निवडणूक प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर
2018 मध्ये टीईटीच्या 600-700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क | DAINIK LOKMNTHAN
शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी रिक्षाचालक जनार्दन निकोले यांचा मुलगा विनोद निकोले यांची नुकतीच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पोलिस नवी मुंबई मेट्रो विभागात भरती झाल्याबद्दल देवकर परिवाराने त्यांचा नुकताच सन्मान करत शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, निलेश देवकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सभापती सुनील देवकर यांनी  भरती झालेल्या विनोद निकोलेला शुभेच्छा देताना सांगितले की, विनोदचे प्राथमिक शिक्षण टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले असून, त्यानंतर रवंदे येथील शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे व त्यानंतर कोपरगाव येथील महाविद्यालयात बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्याला कोणतेही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या हिमतीवर व कष्टावर मोलमजुरी करणार्‍या आईचे व रिक्षा चालविणार्‍या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पोलिस नवी मुंबई मेट्रोपदी भरती झाल्याने नक्कीच निकोले कुटुंबाच्या कष्टाचे सार्थक होऊन टाकळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे मत देवकर यांनी व्यक्त करत विनोदला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS