Homeताज्या बातम्यादेश

पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानच्या अलवर भागातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्षभर पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला पोल

खोट्या बातम्या पसरवणार्‍यानी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!
जम्मू कश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा; दोन रॉकेट लॉन्चरसह मोठा शस्त्रसाठा जप्त
भाजप- शिवसेना युतीच्या दृष्ठीने आणखी एक पाऊल.. रामदास आठवलेंनी सांगितलं नवा फॉर्म्युला

जयपूर/वृत्तसंस्था ः राजस्थानच्या अलवर भागातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वर्षभर पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिची मावशी आणि आजोबांसह पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता चार वर्षांची होती, तेव्हा तिची आई आरोपी पित्याच्या त्रासाला वैतागून माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून पीडित तिच्या पित्यासोबत राहत होती. आई घर सोडून गेल्यानंतर आरोपी पित्याने दुसरे लग्न केले. आरोपीच्या त्रासाला वैतागून त्याची दुसरी पत्नीही घर सोडून निघून गेली. पीडिताने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होता. गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या अत्याचाराला वैतागून पीडिताने हा धक्कादायक प्रकार तिच्या मावशीला सांगितला. यानंतर पीडिताची मावशी आणि आजोबाने पोलीस ठाण्यात पोहोचले. पीडितेचे जबाब नोंदवल्यानंतर नराधम पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस याप्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. राजस्थानच्या अलवरमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना वारंवार घडत आहे.

COMMENTS