Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापारेषणकडून आशादीप विशेष मुलांच्या शाळेस मदत

कराड/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी योजना अंतर्गत कंपनीला मिळणार्‍या नफ्यातून शासकीय शाळा,  विविध सेवाभा

स्वराज्य संघटना नाशिक च्या वतीने श्री छत्रपती संभाजी चौक या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा निमित्त पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
दुष्काळी कान्हूर भागातून गोशाळेला पाच ट्रक चारा
सचिव भांगे यांचा तो दौरा बेनामी संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी का ?

कराड/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी योजना अंतर्गत कंपनीला मिळणार्‍या नफ्यातून शासकीय शाळा,  विविध सेवाभावी संस्था यांना या योजनेतून विविध स्वरूपात मदत केली जाते. याच योजने अंतर्गत सांगली येथील आशादीप विशेष मुलांची शाळा, सांगली (मतिमंद मुलांची शाळा) या शाळेस वस्तु रूपात मदत प्रदान करण्यात आली आहे.
यामध्ये शिलाई मशीन, जिमचे साहित्य, डे केअर सेंटरचे साहित्य, अर्ली इंटरवेशन केंद्राचे साहित्य तसेच मुलांना रोज लागणारे साहित्य प्रदान करण्यात आले. सदरच्या देणगी प्रदान कार्यक्रमास सी. एल. कोळी, प्रभारी मुख्य अभियंता, परिमंडल, कराड, आर. बी. चव्हाण, एस. एम. तावरे व आर. एच. पाटील, हे कार्यकारी अभियंता व आर. डी. कोळी, सहा. महाव्यवस्थापक (मासं) (प्रभारी) परिमंडल, कराड, एस. टी. गोड, एम. जी. पाटणकर, एन. के. डाके, अति. कार्यकारी अभियंता तसेच पी. एस. पाटील, व्यवस्थापक (विवले) व सी. डी. मनगुत्ते, उपव्यवस्थापक (विवले) हे अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास आशादीप शाळेचे डायरेक्टर फादर अनिश कुरियन व सतनामकौर चड्डा, मुख्याध्यापिका तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच या कार्यक्रमास मतिमंद मुलांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमाचे समाजाकडून कौतुक करण्यात येत आहे.

COMMENTS