अमरावती/प्रतिनिधी ः तब्बल 27 गावठी बॉम्ब अमरावतीच्या परतवाडा येथील दोघांकडून पोलिसांनी जप्त केले आहे. सदर बॉम्बचा उपयोग संशयितांनी डुकराची शिकार
अमरावती/प्रतिनिधी ः तब्बल 27 गावठी बॉम्ब अमरावतीच्या परतवाडा येथील दोघांकडून पोलिसांनी जप्त केले आहे. सदर बॉम्बचा उपयोग संशयितांनी डुकराची शिकार करण्यासाठी रानात पेरून ठेवले होते. पोलिसांनी ते वेळीच जप्त केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चाँदसिंग कनिसिंग बावरी (50) व अशोक सावळाराम शिंदे (45) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही परतवाडाचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून तब्बल 27 गावठी बॉम्ब जप्त करण्यात आलेत. पोलिस उपनिरीक्षक सतिश झाल्टे यांच्या तक्रारीवरुन या प्रकरणी दोघांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाँदसिंग कनिसिंग बावरी व अशोक सावळाराम शिंदे हे दोघे जंगली डुकराची शिकार करुन अंजनगाव रस्त्यावरुन येत असल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी केली. काही वेळाने हे दोघे हीरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलद्वारे त्या रस्त्यावरुन परवाड्याकडे येताना दिसले. दुचाकीवर या दोघांच्या मध्यभागी शिकार केलेले जंगली डुकर होते. नाकाबंदी केलेल्या पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता त्यांच्याकडे गावठी बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत या दोघांनी जंगली डुकराची शिकार करण्यासाठी त्यांनी रानात गावठी बॉम्ब पेरुन ठेवले होते, असे सांगितले. विशेष म्हणजे आरोपींच्या मोटारसायकलला (एमएच 27, झेड-7594) बांधलेल्या एका पिशवीतून 27 गावठी बॉम्बही सापडून आले. पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करुन ते बॉम्ब निकामी केले. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेऊन परतवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
COMMENTS