Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चारित्र्यावर संशय घेत पतीने केला पत्नीचा खून

चकलांबा प्रतिनिधी - चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिचा निर्घृण खून केल्याची घटना दि.24ऑगस्ट रोजी पहाटे ग

सोलापुरात पोलिस उपनिरीक्षकाची हत्या
35 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण.
भररस्त्यात चाकुने वार करत तरुणाची हत्या.

चकलांबा प्रतिनिधी – चारित्र्यावर संशय घेत पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड मारून तिचा निर्घृण खून केल्याची घटना दि.24ऑगस्ट रोजी पहाटे गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील दर्गाह परिसरात घडली. पत्नीच्या डोक्यात दगड मारल्यानंतर पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि मी पत्नीच्या डोक्यात दगड मारल्याचे पोलीसांना सांगितले. या प्रकरणात पोलीसांनी स्वतः फिर्याद दिली असुन पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
   औरंगाबाद जिल्ह्यातील आखदवाडा (ता. पैठण) येथील समीर कादर शेख (वय 35) हा पत्नी, दोन वर्षाची मुलगी व स्वतःच्या बहिणीसह चकलांबा (ता. गेवराई) येथे दर्गाहमध्ये दर्शनासाठी काल दि. 24 ऑगस्ट रोजी आला होता. काल रात्री हे कुटूंब त्याच परिसरात झोपले होते. या दरम्यान शरामद उर्फ समीर शेख याने झोपेत असलेल्या पत्नी शबाना शेख (वय 27) हिच्या डोक्यात दगड मारला. आवाज ऐकुन सोबतची बहिण व अन्य लोक जागे झाले. समीर शेख याने बहिणीच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या पत्नी शबानाला जवळच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर होवून समीर शेख याने मी पत्नीच्या डोक्यात दगड मारल्याचे सांगितले. मला तिच्या चारित्र्यावर संशय येत होता. म्हणून मी हे कृत्य केल्याचे त्याने पोलीसांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी खाजगी रुग्णालयात जावुन शबाना हिस तात्काळ चकलांबा सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी बीडला घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार जखमी शबाना हिस बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता आज पहाटे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून तिला मयत घोषित केले. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्याचे पोउपनि अनंता तांगडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शरामद उर्फ समीर कादर शेख यांच्याविरूध्द चकलांबा पोलीस ठाण्यात कलम 302 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन डी वाय एसपी निरज राजगुरू साहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली.यावेळी अमोल येळे, कुलकर्णी आदी कर्मचारी होतें.तसेच पुढील तपास सपोनि नारायण एकशिंगे हे करीत आहेत.

COMMENTS