Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोट्या बातम्या पसरवणार्‍यानी पुरावा द्यावा अन्यथा माफी मागावी!

मुंबई प्रतिनिधी- वंचित बहुजन आघाडीला अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण आलेलं नाही. निमंत्रण नसल्यामुळे आम्ही बैठकीत सहभागी होऊ शकत नाही, हे पक्षाच्याव

सैय्यद रेहान अली या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या इसमाच्या कार्यक्रमावर बंदी घालावी अन्यथा आंदोलन करू – भाजपाचा इशारा 
सामाजिक न्याय विभागाला बदली अधिनियमाचे वावडे
तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन

मुंबई प्रतिनिधी- वंचित बहुजन आघाडीला अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण आलेलं नाही. निमंत्रण नसल्यामुळे आम्ही बैठकीत सहभागी होऊ शकत नाही, हे पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मात्र तरीसुद्धा काही माध्यमे सतत संभ्रम निर्माण करणार्‍या खोट्या बातम्या पसरवत आहेत. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये वंचित बहुजन आघाडीने इंडिया अलायन्सच्या बैठकीकडे पाठ फिरवली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र त्या बातमीत इंडिया अलायन्सच्यावतीने वंचित बहुजन आघाडीला बैठकीचं निमंत्रणच देण्यात आलेलं नाही, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.
त्यामुळे आम्ही सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात खोट्या बातम्या देणं तात्काळ बंद करा. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याऐवजी जी वस्तुस्थिती आहे त्या संदर्भात बातम्या द्याव्यात. आता जनता शहाणी झाली आहे, तुमच्या फेक बातम्यांना बळी पडणार नाहीये. राजकीय पक्षांची किंवा राजकीय नेत्यांची दलाली करणे बंद करावे.  वंचित बहुजन आघाडीला बैठकीचे निमंत्रण दिले असल्याच्या खोट्या बातम्या पेरणार्‍यांना आम्ही आवाहन करतो की, जर असे निमंत्रण पाठवले असेल, तर इंडिया अलायन्सच्या नेत्यांच्या अधिकृत स्वाक्षरीने निघालेले पत्र जनतेसमोर जाहीर करावे. अन्यथा सकाळ माध्यमने खोट्या बातम्या छापल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.

COMMENTS