पुणे जिल्ह्यात ७१ लाख नागरिकांचा पहिला डोस बाकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात ७१ लाख नागरिकांचा पहिला डोस बाकी

पुणे : जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १ कोटी १७ लाख ४८ हजार ६३६ इतकी आहे. त्यातील ४६ लाख

विराटला बर्थडे सरप्राईज देणाऱ्या अनुष्कासोबत घडलं भलतंच
लघुपट व माहितीपट महोत्सवात ‘महासत्ता’, विद्यार्थी गटात ‘उंबरा’ ने मारली बाजी
सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात

पुणे : जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १ कोटी १७ लाख ४८ हजार ६३६ इतकी आहे. त्यातील ४६ लाख ४४ हजार ४५७ नागरिकांचा पहिला डोस तर १६ लाख १३ हजार ५१० नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. याचाच अर्थ अजून सुमारे ७१ लाख नागरिकांचा पहिला डोस घेणे बाकी आहे. सध्या दररोज ५० ते ६० हजार लसीकरण होत आहे. गेल्या आठवड्यात केवळ दोनदा ९० हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत असताना तिसरा डोस द्यावा लागेल का, याबाबत अभ्यास सुरु असताना पहिले दोन डोस लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहेत.ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. लाट थोपवण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर १९ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. २१ जूननंतर लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग मिळाला. त्यानंतर आजपर्यंत केवळ पाच वेळा जिल्ह्यात एका दिवशी एक लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दररोज लसीकरण एक लाखाहून अधिक होणे आवश्यक आहे.

COMMENTS