संगमनेर/प्रतिनिधी ः भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पहिले कृषी मंत्री म्हणून काम करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी
संगमनेर/प्रतिनिधी ः भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळात पहिले कृषी मंत्री म्हणून काम करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी कृषी क्षेत्राचा पाया रचला. अन्नधान्य वाढीसाठी देशात झालेल्या कृषी क्रांती डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मोठे योगदान असल्याचे गौरव उद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी काढले आहेत. यावेळी शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व थोरात महाविद्यालय यांच्यामध्ये सामाजिक करण्यात आला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीसुर्य डॉ. पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे सहसचिव दत्तात्रय चासकर ,संचालक सिताराम वर्पे ,अमरावती संस्थेचे उपाध्यक्ष गजानन फुंडकर, प्राचार्य डॉ दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ अंजली पठारे, डॉ. सरोजनी उंबरकर ,उपप्रचार्य डॉ.बाळासाहेब वाघ, डॉ विलास कोल्हे, नेक समन्वयक डॉ लक्ष्मण घायवट आधी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. तांबे म्हणाले की, डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांनी देशाची पहिली कृषी मंत्री म्हणून केलेले कार्य हे अत्यंत मोलाचे आहे आपल्या विद्वत्तेच्या आणि कार्यकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कृषी क्षेत्राला एक नवी दिशा दिली. विद्यापीठांच्या माध्यमातून कृषी व्यवसायाला बळकटी देत आधुनिकीकरणाची जोड दिली. अन्नधान्यासाठी परदेशांवर अवलंबून असणार्या भारतातून झालेली आज अन्नधान्याची निर्यात यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख ,डॉ अण्णासाहेब शिंदे यांचा विविध मान्यवरांचे मोठे योगदान राहिले असल्याचे ते म्हणाले. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाले की डॉ. पंजाबराव देशमुख आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यात मोठी समानता आहे. ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी शैक्षणिक व कृषी क्षेत्रात त्यांनी केलेले काम हे आजच्या पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे. प्रमुख वक्ते प्रा प्रवीण देशमुख म्हणाले की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ,संत गाडगे महाराज यांचा सहवास लाभलेल्या डॉ पंजाबराव देशमुख यांनी समाज हिताचे अनेक निर्णय घेतले. अस्पृश्यता निवारण, धर्मनिरपेक्षता, समभाव या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी जीवनभर काम केले. आधुनिक व समतेचा पुरस्कार करणारे कृतिशील व्यक्तिमत्व डॉ. देशमुख यांचे होते. अॅड. फुंडकर म्हणाले की डॉ पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची आजच्या पिढीला गरज आहे. या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीनानाथ पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ अंजली पठारे यांनी केले. तर डॉ. बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS