Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन

खा. प्रीतमताई मुंडेंनी स्विकारले निवेदन

प्रतिनिधी बीड -: पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले

राज्यस्तरीय आमदार चषक 2023 कबड्डी स्पर्धेचे आयोजन  संपन्न
मराठी पत्रकार परिषदेच्या 14 पदाधिकार्‍यांची अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती
दुर्दैवाने निकाल विरोधात आला तर देशभरातील ओबीसींना अडचणी – भुजबळ | LOKNews24

प्रतिनिधी बीड -: पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पत्रकारांच्या धरणे आंदोलनाची दखल घेऊन खा. प्रीतमताई मुंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत मागण्यांचे निवेदन स्विकारले. तसेच या संदर्भात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करून तुमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत आणि केंद्र शासनापर्यंत देखील पोहोचवते, असे अश्वासन खा. मुंडे यांनी यावेळी दिले. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनीही आंदोलनस्थळी येत या मागण्यांबाबत सकारात्मकपणे पाहून पत्रकारांचे प्रश्न राज्य माहिती कार्यालयाला कळवू असे सांगितले.  
या आंदोलनात व्हॉईस ऑफ मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, राज्य सहकार्यवाहक व्यंकटेश वैष्णव, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, मराठवाडा कार्याध्यक्ष जालींदर धांडे यांच्यासह पत्रकार अमोल मुळे, विनोद जिरे, सुनील यादव, अक्षय केंडे, विकास माने, आनंद डोंगरे, शुभम खाडे, बालाजी जगतकर, प्रभात बुडूख, केशव कदम, राहुल मारोतीराव वाईकर, अशोक रामेश्वर शिंदे, दादासाहेब जोगदंड, डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, सोमनाथ खताळ, अभिजीत नखाते, मुकेश झनझणे, धनंजय जोगडे, अविशांत कुमकर, विनोद पौळ, विनोद, नरसाळे, काजी मुजीब रहेमान, महंमद अर्शद सिद्दीकी, नदीम मिर्झा, शेख अब्दुल रहीम, डॉ. सिराज खान आरजू, संजय सुकाळे, राहूल वाईकर, शिरीष शिंदे यांच्यासह शेख युनूस, अशोक सुखवसे, धनंजय गुंदेकर यांची उपस्थिती होती. पत्रकारांनी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देखील दिले आहे

COMMENTS