नागपूर/प्रतिनिधी : तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फोडणारा आरोपी गणेश गुसिंगे याच्यासंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण

नागपूर/प्रतिनिधी : तलाठी भरती परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फोडणारा आरोपी गणेश गुसिंगे याच्यासंदर्भात नवीन खुलासा समोर आला आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने घेतलेल्या भरती परीक्षेत तो उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगे याला 138 गुण प्राप्त झाले. संशयित आरोपी उमेदवार उत्तीर्ण झाल्याने भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने काल निकाल जाहीर केला. त्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ग्रंथपाल, स्वच्छता निरीक्षक, ईसीजी तंत्रज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, औषधनिर्माता अशा विविध 5 हजार 182 पदांसाठी भरती परीक्षा घेतली होती. या परीक्षेत याआधी म्हाडा, पिंपरी-चिंचवड पोलीस भरती आणि तलाठी भरती परीक्षेत संशयित आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याला 200 पैकी 138 गुण मिळाले.
COMMENTS