Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यंबक मध्ये एटीएम मध्ये पुरेसे पैसे नसतात यात्रेकरूंची होते अडचण 

त्र्यंबकेश्वर - त्रंबकेश्वर मध्ये एटीएमच्या सुविधा आहेत पण यात पुरेसे पैसे नसल्याने यात्रेकरूंच्या अडचण होते. एटीएम मध्ये पैसे भरताना संबंधित बँक

आर्ट ऑफ लिव्हींगची श्री श्री रविशंकर बीड परिवाराकडून सुदर्शन क्रिया शिबिराचे आयोजन
परमबीर आणि राज्य सरकारलाही तात्पुरता दिलासा
नांदेडनंतर संभाजीनगरमध्ये मृत्यूचे तांडव

त्र्यंबकेश्वर – त्रंबकेश्वर मध्ये एटीएमच्या सुविधा आहेत पण यात पुरेसे पैसे नसल्याने यात्रेकरूंच्या अडचण होते. एटीएम मध्ये पैसे भरताना संबंधित बँका एक दिवसाचे पैसे भरून ठेवतात. शनिवार रविवार सोमवार अथवा जोडून सुट्ट्या आल्या तर यात्रेकरूंची मोठी प्रचंड गर्दी होते त्या मुळे एटीएम मधील पैसे संपतात. त्यामुळे गरजू एटीएम जवळ जातात परंतु पैसे नसल्याने माघारी फिरतात. तर काही वेळा एटीएमला तंत्रिक प्रॉब्लेम राहतो. तसेच डिजिटल व्यवहार करणाऱ्या यात्रेकरू कडे पाच दहा रुपये सुट्टी नसतात स्कॅनर ची मागणी केली जाते. अथवा शंभर रुपये स्कॅनर द्वारे फिरवले टाकले  जातात व नव्वद रुपये यात्रेकरू मागून घेतात कारण नोटांची गैरसोय दूर होते. काही लोक पैसे रोखिनेच मागतात स्कॅनर ऑनलाईन मोबाईल घेत नाही.

काहींना दुकान दाराना यात्रेकर पैसे ऑन लाईन टाकले असे सांगतात.पण पैसे मिळाले नाही असे ही अनुभव काहींना सुरवातीला आले अथवा येतात. तरअनेक वेळा मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम असल्याने ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही ताटकळत बसावे लागते. इथे बँकांनी सुट्ट्या लक्षात घेऊन किंवा गर्दी लक्षात घेऊन एटीएम मध्ये जादा भरपूर पैसे भरून ठेवावेत अशी मागणी वाढत आहे. दरम्यान कुशावर्त तीर्थ चौक,  संत निवृत्तीनाथ मंदिर या भागात एकही एटीएम नसल्याने गर्दीत त्रंबकेश्वर मंदिराकडे परिसर कडे भावीक  गरजूंना यांना करणे यावे लागते त्र्यंबक मध्ये विवध बँकांनी एटीएम ची संख्या निरनिराळ्या भागात वाढवण्याची मागणी आहे.

COMMENTS