Homeताज्या बातम्याविदेश

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक आणि सुटका

जॉर्जियाच्या निवडणुकीत गैरप्रकारामुळे कारवाई

न्यूयार्क/वृत्तसंस्था : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिकेमुळे चर्चेत राहणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्यानंतर

Ahmednagar : अहमदनगर शहरात लागणार स्मार्ट एलईडी दिवे (Video)
सावेडी येथील सय्यद पीर बाबांच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन द्यावा
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर

न्यूयार्क/वृत्तसंस्था : नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि भूमिकेमुळे चर्चेत राहणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी 2020 मध्ये जॉर्जियाच्या निवडणुकांत गैरप्रकार केल्याने त्यांच्यावर अटक होण्याची टांगती तलवार होती. मात्र, त्यांनी शरणागती पत्करत पोलिस ठाण्यात हजर झाले. या ठिकाणी त्यांचे आरोपीसारखे फोटो देखील काढण्यात आले. यानंतर अटलांटा येथील फुल्टन काउंटी तुरुंगातून तब्बल 2 दशलक्ष डॉलर्स रोख आणि इतर अटींसह आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. ट्रम्प हे तब्बल 20 मिनिटे कारागृहात होते.
ट्रम्प यांना गुरुवारी रात्री विविध गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांनी आत्मसमर्पण केले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, ’मी काहीही चुकीचे केले नाही’. ट्रम्प हे साक्षीदारांना धमकावण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असल्याने या पुढे सोशल मीडिया वापरण्यास कोर्टाने त्यांना मनाई केली आहे. फुल्टन काउंटी हे पहिले प्रकरण आहे जिथे ट्रम्प यांना रोख रक्कम भरावी लागली. येथे पैसे न भरता जामीन मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, ट्रम्प यांचे समर्थक जेलबाहेर जमले होते. त्यांनी जिल्हा न्यायाधीश फॅनी विलिस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बिलिस यांनी निवडणुकीशी संबंधित प्रकरणात ट्रम्प यांच्यासह 18 जणांवर आरोप केले आहेत. ट्रम्प यांचे गुरुवारी अटलांटा येथील हार्ट्सफील्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तो येण्यापूर्वीच कारागृहाच्या आसपासची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

COMMENTS