पुणे/प्रतिनिधी ः एल अँड टी कंपनीने भाडेतत्वावर घेतलेल्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून प्रोजेक्ट डायरेक्टर ने 1 कोटी 34 लाख 78 हजार 164 रुपया
पुणे/प्रतिनिधी ः एल अँड टी कंपनीने भाडेतत्वावर घेतलेल्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून प्रोजेक्ट डायरेक्टर ने 1 कोटी 34 लाख 78 हजार 164 रुपयांची फसवणूक केली आहे. तर जनरल स्ट्रक्चर मॅनेजर चढ्या दराने देयक मंजूर करून कंपनीची 47 लाख 9 हजार 561 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुल सुबीर बॅनर्जी (वय 46, रा. ठाणे) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रोजेक्ट डायरेक्टर विजयकुमार माथनकुमार (रा. खराडी), मॅनेजर स्ट्रक्चर बसवराज चन्नागि यासह इतर 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2019 ते आज पर्यंतच्या काळात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे एल अँड टी कंपनीचे जनरल मॅनेजर सिक्युरिटी आहेत. एल अँड टी कंपनीने कन्स्ट्रक्शन कामासाठी लागणारे साहित्य हे भाडेतत्वावर घेतले होते. विजयकुमार माथनकुमार हे माहित असतांनासुध्दा पदाचा गैरवापर करून भाडेतत्वार घेतलेल्या साहित्याचे इतर सहकार्यांच्या मदतीने विल्हेवाट लावून कंपनीचे 1 कोटी 34 लाख 78 हजार 164 रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच मिशन घेऊन व्हेंडर, सब कॉन्ट्रॅक्टरचे चुकीच्या पद्धतीने बिले मंजूर करून कंपनीचे नुकसान केले आहे. तर बसवराज चन्नागि हे कंपनीत मॅनेजर स्ट्रक्चरल म्हणून कामाला होते. बसवराज चन्नागि हा कंपनी आणि व्हेंडर, सबकॉन्ट्रँक्टर यांच्यामधील दुवा एजंट होता. बसवराज चन्नागिने साईटवर कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे काम न करता. स्वतःच्या फायद्याकरता ओरिएण्टल रेल इन्फास्ट्रक्चर प्रा. लि. व टेक्नोक्रॅफ्ट इंडस्ट्री या रजिस्टर व्हेंडरच्या वर्क ऑर्डरला मंजुरी देऊन त्यांना चढ्या दराने देयक मंजूर करून त्या बदल्यात कमिशन म्हणून पत्नीच्या फर्मच्या बँक खात्यावर 47 लाख 9 हजार 561 रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट 4 चे पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील करत आहे.
COMMENTS