Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्ली-मुंबई महामार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. या धडकेनंतर टँ

बीडमध्ये अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. या धडकेनंतर टँकर उलटला तर, रोल्स रॉयस कारने पेट घेतला. या भीषण अपघातात दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 कोटी किमतीची रोल्स रॉयस कार जळून खाक झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील नगीना पोलिस स्टेशनच्या उमरी गावाजवळ एका डिझेल टँकरने रोल्स-रॉईस कारला धडक दिली. या धडकेनंतर यामुळे टँकर उलटला, तर आलिशान महागड्या रोल्स रॉयस कारने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की काही क्षणात कार पुर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. रोल्स रॉयसमध्ये बसलेल्या महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गुडगाव येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या अपघातात जळालेली कार ही सर्वात महागड्या रोल्स रॉयस कंपनीची होती. या कारची भारतीय बाजारात किंमत तब्बल 10 कोटी आहे. या भीषण अपघातानंतर दिल्ली- मुंबई महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

COMMENTS