नांदेड प्रतिनिधी - ट्रेन चुकू नये म्हणून आपण घाई करत असतो. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचाही कधीकधी प्रयत्न केला जातो. मात्र, हा प्रयत्न कधी अंगल
नांदेड प्रतिनिधी – ट्रेन चुकू नये म्हणून आपण घाई करत असतो. चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचाही कधीकधी प्रयत्न केला जातो. मात्र, हा प्रयत्न कधी अंगलट येतो. याचमुळं रेल्वे अपघातांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न तरुणाच्या जीवावर बेतला आहे. या तरुणाला एक पाय गमवावा लागला आहे. धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न एका युवकाच्या चांगलाच अंगलट आला आहे. या अपघातात युवकाला एका पाय देखील गमवावा लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये ही घटना घडली असून संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नांदेडकडे जाणाऱ्या इंटरसिटी या धावत्या रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना या तरुणाचा पाय घसरला. त्यानंतर तोल जाऊन तो रेल्वे व फलाटाच्या मध्ये असलेल्या जागेत पडला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे. 25 वर्षीय महेश कनाके असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गाडी उभी असताना रेल्वेत बसण्याऐवजी महेशने गाडी सुरू झाल्यानंतर चढण्याचा प्रयत्न केला. रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा पाय घसरला आणि तो गाडीच्या खाली फरफटत गेला. महेश ट्रेनखाली आल्याचे प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केल्याने गाडी थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचारी व सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. तरुणाचा जीव वाचला पण या अपघातात त्याचा एक पाय पूर्णपणे तुटला आहे. गंभीर अवस्थेत त्याला उपाचारांसाठी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओत काय?ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली असताना युवक प्लॅटफॉर्मवर असूनदेखील तो ट्रेनमध्ये चढला नव्हता. मात्र जेव्हा ट्रेन सुरू झाली आणि ट्रेनने वेग पकडला तेव्हा त्याने धावत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण हात निसटल्याने त्याला ट्रेनमध्ये चढता आलं नाही आणि ट्रेनसोबत तो फरफटत गेला. व काही कळायच्या आतच तो फलाटाच्या आत खेचला गेला. हा अपघात इतका भयंकर होता की त्याला एक पाय गमवावा लागला आहे.
COMMENTS