Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनावरांसाठी चारा छावणी चालू करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संगमनेर तालुका शाखेने केली मागणी

संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यात पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटलेले आहेत. तरी पाऊस नसल्याने जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालल

बाबूजी आव्हाड महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात
इंग्रजी शिक्षणामुळे प्रवरेची जागतिक स्तरावर ओळख
कुळधरणच्या उत्सवात दोघांना जबर मारहाण

संगमनेर/प्रतिनिधीः संगमनेर तालुक्यात पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटलेले आहेत. तरी पाऊस नसल्याने जनावरांचा चारा, पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे जनावरांच्या चारा पाण्यासाठी शासनाने छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर तालुक्याच्या वतीने तहसीलदार संगमनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पावसाळ्याचा सप्टेंबर महिना हा महिना शिल्लक राहिल्याने या महिन्यात पुरेसा पाऊस पडेल. अशी शक्यता फारच कमी आहे. त्यातच संगमनेर तालुका हा अधिकतम दुष्काळी आहे.  चालूवर्षी शेतकर्‍यांनी पेरलेले धान्य व शेतीमाल पावसाअभावी जळून चाललेले आहे.दुबार पेरणीची शक्यता ही मावळलेली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरीवर्ग दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने जनावरासाठी छावण्या व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक वर्पे, तालुका अध्यक्ष अशोक शिंदे,शहराध्यक्ष तुषार ठाकूर, तालुका उपाध्यक्ष तुषार बडे, युसुफ शेख, बजरंग घुले, आकाश भोसले, सम्राट हासे, स्वप्निल खरात आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS