महाडिक गटाचा सहकार पॅनेलला पाठिंबा : राहुल महाडिक यांची घोषणा

Homeमहाराष्ट्र

महाडिक गटाचा सहकार पॅनेलला पाठिंबा : राहुल महाडिक यांची घोषणा

कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भोसले गटाला पाठिंबा देण्यासाठी कल होता. नानासाहेब आणि भोसले परिवार यांचा जिव्हाळा होता.

आमदार काळेंकडून कोपरगाव शहराच्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी
पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 
महाराष्ट्र केसरी पै. बाला रफीक शेख याने मारले पणुंब्रेचे मैदान

इस्लामपूर / प्रतिनिधी : कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भोसले गटाला पाठिंबा देण्यासाठी कल होता. नानासाहेब आणि भोसले परिवार यांचा जिव्हाळा होता. अतुल भोसले हे आमचा शब्दाला मान देतात. कारखाना सुरेश बाबा यांनी चांगला चालवला आहे. संचालक मंडळात गिरीश पाटील यांना संधी मिळाली आहे. कोणावर टीका टिप्पणी न करता अतुलबाबा यांच्याशी असणारे मित्रत्वाचे पर्व पुढे चालवत. आमच्या गटाशी निगडित कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील, असा विश्‍वास राहुल महाडिक यांनी व्यक्त केला. ते पेठ नाका येथील पत्रकार बैठकीत बोलत होते. या निमित्ताने कृष्णेचे अध्यक्ष सुरेश भोसले, सी. बी. पाटील, सम्राटबाबा महाडिक, जि. प. सभापती जगन्नाथ माळी, कृष्णा बँकेचे संचालक नामदेवराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.महाडिक गटाने सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. या गटाने मागील निवडणुकीत पाठिंबा दिल्याने आमच्या काही जागा काही फरकाने निवडून आल्या होत्या. स्व. नानासाहेब यांच्या पश्‍चात राहुलदादा आणि सम्राटबाबा यांच्या पाठिंब्याने स्नेह आणखी घट्ट झाला असल्याचे य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले. सम्राट महाडिक म्हणाले, रेठरे कारखाना ते रेठरे धरण या दरम्यानच्या स्व. नानासाहेब यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील. यामुळे या कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. दैनंदिन जीवनात बरीचशी कामे असतात. अतुलबाबा यांना कोणतीही सूचना केली की ते त्याचे निराकरण लगेच करतात. महाडिक गटाचे कार्यकर्ते दिलेला शब्द पाळतील, अशी ग्वाही त्यानी दिली.सी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गिरीश पाटील, आनंदराव मोहिते, वैभव जाखले, बाबुराव गुरव, किरण उथळे, शंकर पाटील, जालिंदर शिंदे, बबन शिंदे, शंकर पाटील, राहुल पाटील, हर्षवर्धन पाटील, सरगम मुल्ला, संजय घोरपडे, डी. के. पाटील, डी. के. कदम, विशाल शेटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS