पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासूंन वाढत चालल्या आहे. बुधवारी सकाळी कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एकाचा खून करण्यात
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासूंन वाढत चालल्या आहे. बुधवारी सकाळी कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एकाचा खून करण्यात आला होता. ही घटना ताजी असतांनाच आणखी एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका पतीनचे केवळ तीन हजार रुपयांसाठी पत्नीला वेश्याव्यवसायात उतरवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. या साठी त्याने त्याच्या मित्रांच ग्राहक बनवले.
पुण्यातील हडपसर येथे हा गुन्हा घडला असून पोलिसांनी नराधम पतीला आणि त्यांच्या दोन मित्रांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी 25 वर्षांच्या पत्नीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती आणि त्याचे दोन मित्र आदित्य गौतम (रा.कसबा पेठ) आणि सुजित पुजारी (रा. आंबेगाव) यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही तिच्या पती सोबत उंड्री येथे राहायला आहे. दरम्यान, तिच्या पतीने पैशाच्या लालसेपोटी पत्नीला मारहाण करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे केले होते. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, नराधम पतीने त्याच्या दोन मित्रांनाच ग्राहक बनवून प्रत्येकी तीन हजार रुपये घेत पत्नीला त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास बळजबरी केली होती. त्याच्या दोन्ही मित्रांनी तिच्यासोबत इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवले. दरम्यान, ही महिला रस्त्याने जात असतांना पतीच्या या दोन मित्रांनी तिला अडवत तिच्याची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे तिने थेट पोलिस ठाणे गाठत पती आणि त्याच्या दोन्ही मित्रांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी लगेच कारवाई करत तिघांना अटक केली आहे.
COMMENTS