Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक संघाकडून सहकार्याचे कौतुक..!

अंबाजोगाई प्रतिनिधी - येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सहसचिव तथा सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सेलमोकर यांचे विविध सामाजिक संघटना तसेच सहकार्यां

इस्रायलमध्ये अल जझीरा वृत्तवाहिनीवर बंदी
कोपरगाव बस आगारात वरिष्ठांच्या खुर्च्या रिकाम्या
या ठिकाणी कुरियरमधून आले 27 किलो ड्रग्स

अंबाजोगाई प्रतिनिधी – येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सहसचिव तथा सामाजिक कार्यकर्ते पद्माकर सेलमोकर यांचे विविध सामाजिक संघटना तसेच सहकार्यांनी अभिष्टचिंतन करून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. वृक्षारोपनासह विविध उपक्रम राबविण्यात आले.
येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव, पेशवा संघटनेचे अध्यक्ष तथा योगेश्वरी रोटरी क्लब अंबाजोगाईचे माजी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पद्माकर दत्तात्रय सेलमोकर यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच छोटेखानी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दामोधर थोरात, धनराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नगारिक संघाचे सचिव मनोहर कदम यांनी केले. यावेळी ग्रामदेवता माता योगेश्वरी देवी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तर सेलमोकर कुटूंबियांच्या वतीने पुंडलिक पवार, धनराज मोरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सौ.प्रणिता पद्माकर सेलमोकर, मुलगी सौ.प्रतिज्ञा जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नगारिक संघाकडून श्री व सौ.सेलमोकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पुंडलिक पवार, श्रीरंग चौधरी, मनोहर कदम, डॉ.दामोधर थोरात, धनराज मोरे, विजय विर्धे, हरेगावकर वामन जोशी, भागवत कांबळे, लक्ष्मण गोरे, बालासाहेब आगळे, कमल बरूळे, मंगला भुसा या ज्येष्ठ सहकार्यांनी सेलमोकर दांम्पत्याला शुभेच्छा दिल्या. तर विर्धे, पवार, मोरे, कदम, भुसा, कांबळे व गोरे यांनी आपले अभिष्टचिंतनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अशोक टाकळकर, रेवलकर, आगळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारीणीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, पद्माकरराव सेलमोकर हे मराठवाडा ब्राह्मण सभेचे वरिष्ठ सल्लागार आहेत. तसेच ते अखिल भारतीय पेशवा संघटनचे अंबाजोगाई तालुकाप्रमुख असून ज्येष्ठांच्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नागरिक संघ व पेन्शनर्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत, इरिगेशन विभागातून ते काही वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले असून सध्या ते आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून सर्व जनतेची सेवा करीत आहेत, समाजातील कोणत्याही व्यक्तीच्या मदतीसाठी क्षणार्धात धावून येणारे मितभाषी समाजसेवक आहेत. असे विचार व्यक्त केले. तर आपल्या सत्काराला उत्तर देताना पद्माकर सेलमोकर म्हणाले की, आपण नियत वयोमानानूसार ज्येष्ठ नागरिक संघात कार्यरत असल्यामुळे मित्र तसेच परिवाराचे प्रेम, अपुलकी व जिव्हाळा वाढला आहे. या पुढेही समाजाचे कार्य करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कटीबद्ध राहू. या उपक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मनोहर कदम यांनी सर्व ज्येष्ठांना व मान्यवरांना स्वतः फोन करून व उपस्थित राहण्याचे निमंत्रण देवून एकत्रित आणल्याबद्दल सेलमोकर यांनी कदम यांचे आभार मानले. तर ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सेलमोकर परिवाराने आयोजित केलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार वेदांत जोशी यांनी मानले.

COMMENTS