बीड प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील संपूर्ण पिके करपली असुन शेतकर्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी मदत म्हणून तातडीने हेक्टरी 1 लाख
बीड प्रतिनिधी – बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील संपूर्ण पिके करपली असुन शेतकर्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी मदत म्हणून तातडीने हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी ऊसतोड कामगार कृती समितीचे बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यात पावसाने मागील तीन आठवड्यापासून खंड दिला आहे. यामुळे पिके करपत चालल्याने यावर्षीही पीकांचे जवळ जवळ आज तरी 100 % नुकसानी झाल्याचीच शक्यता आहेत. सलग 21 दिवस पावसाने खंड दिल्यास व उत्पादनात 50 टक्क्यांपेक्षा जास्त तूट येणार असल्यास पीक विमा योजनेतील नियमानुसार शेतकर्यांना 25 टक्के भरपाई अग्रीम म्हणून कंपनीने देणे बंधनकारक आहे. यामुळे जिल्ह्यातील महसूल मंडळात 22 दिवस खंड पूर्ण झाला आहे.तरी बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी या नियमाचे स्मरण ठेवून तात्काळ बैठक बोलवून पंचनामे करण्यासाठी निर्देश द्यावेत. तसेच बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत तातडीने मिळण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत तसेच पिक विम्याचे पैसे मिळतील असे नियोजन करावे असे आवाहन ऊसतोड कामगार कृती समितीचे बाजीराव ढाकणे यांनी केले आहे.
COMMENTS